सरकारने आपणच लष्कर असल्यासाखे वागू नये- अखिलेश यादव

लखनौ: आपणच लष्कर आहोत अशा थाटात सरकारनेही वागता कामा नये व त्यांच्या शौर्याचा त्यांनी राजकीय वापर करू नये, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोदी सरकारला खडसावले आहे. पुलवामा हल्ला प्रकरणात मोदींनी विरोधकांना लक्ष केल्यानंतर अखिलेश यादव यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.

अखिलेश यादव म्हणाले, लष्कराच्या जवानांनी जी प्राणाची आहुती दिली आहे त्याविषयी कोणीही शंका उपस्थित करणे योग्य नाही हे खरे आहे पण आपणच लष्कर आहोत अशा थाटात सरकारनेही वागता कामा नये व त्यांच्या शौर्याचा त्यांनी राजकीय वापर करू नये. सरकारच्या कोणत्याही कृत्याविषयी जाब विचारण्याचा विरोधकांना अधिकार आहे असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांना प्रश्‍न विचारण्याचा अधिकार नाही ही सरकारची भूमिका अधिक घातक असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)