सरकारने विशिष्ठ कमेटी बनवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी

पाबळ – हैदराबादमधील तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळण्याचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या चारही आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला असून, त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटत आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली ते योग्य झाले, असे मत सध्या व्यक्त केले जात आहे. मात्र अश्या घटनेसाठी सरकारने एक विशिष्ठ कमेटी तयार करवून या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी असे काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिस घटनास्थळी तपासणी करण्यासाठी घेऊन गेले होते. तेव्हा आरोपी पळून जाण्य़ाचा प्रयत्न करताना त्यांचा पोलिसांकडून खात्मा करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.