महाराष्ट्र सरकारने दिली क्वाड्रीसायकलला परवानगी

मुंबई – महाराष्ट्र शासनाने क्वाड्रीसायकलला परवानगी दिली आहे. त्यानंतर बजाज ऑटो कंपनीने क्‍युट नावाची क्वाड्रीसायकल राज्यात सादर केली आहे. केरळसह काही राज्यांनी या नव्या वाहन प्रकाराला अगोदरच परवानगी दिली आहे. यामुळे शहरातील प्रवासाची पद्धत पूर्णपणे बदलणार असल्याचा दावा बजाज ऑटोच्या आंतर शहर वाहतूक व्यवसाय विभागाचे महाव्यवस्थापक नवनीत साहनी यांनी केला.

क्वाड्रीसायकल स्वस्त, पर्यावरण-स्नेही आणि सुरक्षित इंट्रासिटी प्रवासासाठी तयार केली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण अशा दळणवळणाच्या आव्हानांवर क्‍यूट हा एक पर्याय ठरणार आहे. हे वाहन सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन्ही प्रकारांत आहे. क्‍यूटकरिता देखभाल खर्च अगदीच अल्प लागतो, ज्यामुळे नियमित प्रवास सोपा बनतो.
ते म्हणाले की, कोणत्याही कारशिवाय यामध्ये 40% कमी कार्बन उत्सर्जन होते. या माध्यमातून राज्यात रोजगाराला चालना मिळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.