कुमारस्वामी यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट

कर्नाटक सरकार सुरळितपणे चालण्याची दिली ग्वाही 

नवी दिल्ली -कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी गुरूवारी येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. कर्नाटकमधील जेडीएस-कॉंग्रेस आघाडी सरकारचे कामकाज सुरळितपणे सुरू असल्याची ग्वाही कुमारस्वामी यांनी त्या भेटीत दिली.

कॉंग्रेसच्या काही असंतुष्ट आमदारांनी भाजपशी संपर्क वाढवल्याने आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपने जोरदार मुसंडी मारल्यामुळे कॉंग्रेस आणि जेडीएसला मोठा हादरा बसला. त्यातून त्या पक्षांमधील मतभेद वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, कुमारस्वामी आणि राहुल यांच्या भेटीला महत्व आहे. कॉंग्रेस आणि जेडीएसमध्ये चांगले सहकार्य आणि चांगला समन्वय असल्याचेही कुमारस्वामी यांनी भेटीत सांगितले.

लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या पीछेहाटीची जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, देशाला तुमच्या सेवेची गरज आहे. राजीनामा देऊ नका, असे आवाहनही कुमारस्वामी यांनी राहुल यांना केले. त्यांच्यात लोकसभा निवडणूक निकालाबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

1 Comment
  1. Vasantrao Yadav says

    Very nice

Leave A Reply

Your email address will not be published.