भाजपच्या वतीने दुध दरवाढीसाठी कोविड केंद्रात दूध वाटप
नगर (प्रतिनिधी) – भाजप सरकारच्या काळात दुधाला 25 ते 30 रुपये दर देण्यात आला होता. तसेच शेतकऱ्यांना पाच रुपये थेट अनुदान जाहीर केले होते. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले असून दुधाचे भाव कमी केले आहेत. तसेच खतासाठी शेतकऱ्यांना रांगा लावण्याची वेळ आली आहे. मात्र, सरकार डोळे झाकून गप्प बसले आहे. या सरकारला जाग येण्यासाठी व शेतकऱ्यांना दूधाला योग्य भाव मिळण्यासाठी महायुती च्यावतीने कोविड केंद्रात दूत वाटप करण्यात आले आहे. असे भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सांगितले.
नगर शहरात भाजप च्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या मार्गदर्शना नुसार दूध दर वाढ आंदोलन करण्यात आले. बूथ हॉस्पिटल कोविड सेंटर, भिंगार कॅटेन्मेंट हॉस्पिटल कोविड सेंटर, आनंद लॉन्स महापालिका कोविड सेंटर, रोटरी कोविड सेंटर सारस नगर दूध आंदोलन निमित्त येथे दूध वाटप करण्यात आले.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, युवा नेते सुवेंद्र गांधी, संघटन सरचिटणीस ऍड. विवेक नाईक, कोषाध्यक्ष चेतन जग्गी, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश तवले, प्रसिद्धी प्रमुख अमित गटणे, मयूर बोचुघोळ, दत्ता गाडळकर, भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड, केडगाव मंडल अध्यक्ष पंकज जहागीरदार, शहर उपाध्यक्ष शिवाजी दहीहंडे, संपत नलावडे, साहिल शेख, अविनाश सांखला, शशिकांत पालवे, विलास गांधी, महादेव गाडे, पवन चुटके, पुष्कर कुलकर्णी, शिवा आढाव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शेती व्यवसायाबरोबर शेतकरी जोडधंदा म्हणून दूध हा व्यवसाय करत असतो. करोना संसर्ग आजाराच्या काळात शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच दूध दरही कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यासाठी आज महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
भाजप महायुतीने 21 जुलैरोजी राज्यभर शासनाला दूध भेट देऊन 1 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता. दूध दरवाढीसंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास 1 ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले होते.. या पार्श्वभूमीवर आज नगर शहर व जिल्ह्यातील सर्व भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.