माझ्याविरोधात खटला लढवून सरकार करदात्यांचे पैसे वाया घालावतेय – विजय मल्ल्या

लंडन – मी बुडवलेले बॅंकांचे पैसे परत घ्या, पण ब्रिटनच्या न्यायालयात माझ्याविरोधात खटला चालविण्यासाठी भारतीय करदात्यांचा पैसा वाया घालवू नका, असे आवाहन मद्यसम्राट विजय मल्ल्याने ट्विटद्वारे केले आहे. तसेच बॅंकांची बुडवलेली रक्कम परत करण्याची पुन्हा तयारी दर्शविली आहे.

विजय मल्ल्याने ट्विट करत म्हटले आहे की, एसबीआयच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक बॅंकिंग क्षेत्रातील समूह चुकीच्या पद्धतीने माझ्यावर कारवाई करत आहे. तसेच माझ्याविरोधात भारताने ब्रिटनमध्ये खटला दाखल केला आहे. करदात्यांच्या पैशांवर माझ्याविरोधात खटला लढवला जात आहे. भारतात माझ्याकडची सर्व थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे. स्वत: पंतप्रधानांनी त्याचा खुलासा केला आहे, असे ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
केवळ भारतीय करदात्यांच्या पैशावर भारतीय वकील ब्रिटनमध्ये चमकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर एसबीआयने उत्तर द्यायला हवे. मीडियाला खळबळजनक हेडलाइन हवी असते. पण ब्रिटनमधील वकिलांवर करदात्यांचा किती पैसा खर्च केला जातोय, हे आरटीआयच्या माध्यमातून कोणीच कसे विचारत नाही. ही माहिती का पुढे येत नाही. मी तर एकूण एक रक्कम परत करण्याचा प्रस्तावही दिला आहे, असेही त्याने म्हटले आहे.

दरम्यान, लंडनमधील “आयसीआयसीआय यूके’ बॅंकेत मल्ल्याच्या खात्यात सुमारे 2 लाख 60 हजार पौंड इतकी रक्कम जमा आहे. या रकमेतून कर्जाची थकबाकी वसूल करण्यापासून भारतीय बॅंकांना रोखण्याचा मल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र, ब्रिटनच्या हायकोर्टाने विनंती अर्ज फेटाळल्याने मल्ल्याचा डाव उधळला गेला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)