पुणे/हडपसर- माझं कुटुंब माझी जबाबदारी.., म्हणणारे सरकार जनतेसाठी काहीच करताना दिसत नाही, अशा शब्दात भाजप महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केली.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त शहर चिटणीस संदीप लोणकर यांच्या वतीने केशवनगर येथे आरोग्य तपासणी मोहीम, आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी वाघ बोलत होत्या. यावेळी पक्षाचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, माजी आमदार जगदीश मुळीक, सरचिटणीस दीपक नागपुरे, उपाध्यक्ष दिलीप काळोखे, भूषण तुपे, कुलदीप सावलेकर, जि. प. सदस्या वंदना कोद्रे, पं. स. सदस्य जितेंद्र भंडारी, संदीप दळवी, अविनाश मगर, दादा कोद्रे, शारदा पानमंद, भास्कर राऊत, कुलदीप कोद्रे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकेत लोणकर, तुषार शिर्के, सागर लोणकर, राहुल लोणकर, ज्ञानेश लोणकर, शुभम हरगुडे, रोहित लोणकर, अक्षय तारू, विकी लोणकर, सतीश लोणकर, किरण लोणकर, वैभव लोणकर, ज्ञानेश्वर लोणकर आणि अखिल लोणकर नगर मित्रमंडळ, एन्जॉय ग्रुप फाउंडेशन, संदीपदादा लोणकर मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.