सरकारने आणि कोर्टाने पोलिसांच्या पाठिशी राहिले पाहिजे – प्रणिती शिंदे

नवी दिल्ली –  हैद्राबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करून तिला नंतर जिवंत जाळल्याच्या प्रकरणातील चारही आरोपी आज सकाळी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. यावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी हैद्राबाद पोलिसांचे अभिनंदन करत पीडितेच्या आत्म्याला शांती मिळली असेल, असे म्हंटले आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या कि, हैदराबादमध्ये जे घडले त्यामुळे देशातील इतर पोलिसांना हिंमत मिळाली असेल. सरकारने पोलिसांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. ही फाईल बंद करा, कायद्यात चौकटीत ही घटना आणणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले आहे.

तसेच पोलिसांच्या या कारवाईने मुलींना आणि महिलांना बळ मिळाले आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. सरकारने आणि कोर्टाने त्यांच्या पाठिशी राहिले पाहिजे. उन्नावबाबतीत जे घडलं तसं यापुढे व्हायला नको. आरोपींनी जेलमधून सुटून बलात्कार पीडितेला जाळलं हे कृत्य निषेधाचं आहे, असेही त्यांनी  म्हंटले आहे.

दरम्यान, बलात्काराच्या या घटनेनंतर देशभरात रोष व्यक्त करण्यात आला होता. यानंतर न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. परंतु, आरोपींना तातडीने शिक्षा सुनावली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामान्यांनी व्यक्त केली होती. चारही आरोपींना त्याच ठिकाणी एन्काऊंटरमध्ये मारले गेल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.