खुशखबर…पीएफच्या व्याजदरात वाढ

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सहा कोटीहून अधिक सदस्यांना सरकारकडून खुशखबर देण्यात आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 8.65 टक्के व्याज खातेधारकांना मिळणार आहे. कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी याविषयी माहिती दिली. तसेच पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ही वाढीव रक्‍कम लवकरच ईपीएफओ आपल्या 6 कोटी सदस्यांच्या खात्यात व्याज जमा करेल. या सभासदांना 8.65 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी यावषियी माहिती दिली. अर्थमंत्र्यांनी 8.65 टक्के व्याजदरासाठी सहमती दर्शवली असल्याचे गंगवार यांनी म्हटले. यापूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की अर्थ मंत्रालय व्याज दर कमी करण्यास सांगत आहे. मात्र, आता ईपीएफच्या भागधारकांना 8.65 टक्के दराने व्याज मिळणार आहे. यापूर्वी कामगार मंत्रालय लवकरच सन 2018-19 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ठेवीवरील 8.65 टक्के व्याज दर सूचित करेल. कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी यापूर्वी याबाबत माहिती दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.