‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला आज 33 वर्ष पूर्ण झाली…
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीचा आत्मा समजला जाणारा ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला आज 33 वर्ष पूर्ण झाली आहे. 23 सप्टेंबर 1988 रोजी हा चित्रपट रुपेरी पाड्यावर आला होता. चित्रपटाला आज इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही.
मराठी चित्रपटाच्या इतिहासात क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले आहे. सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना नेमक्या शब्दात मांडण्यासाठी ही या चित्रपटातील संवाद, दृश्यं यांचाच सर्वाधिक वापर केला जातो. आजच्या पिढीने देखील या चित्रपटाला डोक्यावर घेतल्याचे दिसून येत आहे.
बनवाबनवी चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहे. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट ‘बिवी और मकान’ या हृषिकेश मुखर्जी यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक आहे.