मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर राजकारणात सतत ऐक्टिव्ह असतात. त्यामुळेच त्याचं फळ त्यांना मिळालं आणि त्यांची निवड राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्याची वर्णी लागली. सध्या त्यांच्या एक पोस्ट चर्चेत असून त्यात त्यांनी आयुष्यातील स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे.
फेसबुकवर पोस्ट करत रुपाली चाकणकर यांनी म्हटलं की, “आज आदरणीय साहेबांसोबत वानखेडे स्टेडियम येथे जाण्याचा योग आला. आयुष्यातील स्वप्नांपैकी एक सोनेरी स्वप्न आज पूर्ण झाले.
साहेबांनी क्रीडा क्षेत्रात केलेलं कार्य उत्तुंग आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय, आयसीसी या संघटनांच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर नेण्याचं काम साहेबांनी केले आहे. त्याच्या उपस्थित या मैदानावर झालेले क्रिकेटचे सामने लहानपणापासून फक्त टीव्ही वर पाहत आले, आज प्रत्यक्ष माझ्या दैवतासोबत उपस्थित राहून पाहण्याचा योग आला. धन्यवाद साहेब.
रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासह वानखेडे स्टेडियमला भेट दिली.