चांदीच्या भावात 25 रुपयांनी वाढ
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाव वाढलेल्या कमोडीटी मार्केटमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सोने 351 रुपयांनी स्वस्त झाले असून त्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 51800 रुपये झाला आहे. चांदीमध्ये मात्र वाढ झाली आहे.
जागतिक बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमती वाढल्या होत्या. त्याचे पडसाद स्थानिक बाजारात उमटले. सोन्याच्या भावात 0.4 टक्के वाढ झाली असून दहा ग्रॅमचा भाव 52 हजार 345 रुपये झाला. चांदीच्या भावात 1 हजार रुपयांनी वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव 68 हजार 579 रुपये झाला आहे. मात्र आज सोन्याचा भाव 351 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅमला 51 हजार 800 रुपये झाला तर, चांदीच्या भावात 25 रुपयांची वाढ झाली. सोन्याची आयात कमी झाल्याने केंद्र सरकारला दिलासा मिळाला असून चालू खात्यातील तूट मर्यादित ठेवणे आता सरकारला शक्य होणार आहे.