‘सुवर्ण’ कन्या पुन्हा चमकली

नवी दिल्ली – भारताची सुवर्ण कन्या हिमा दास सध्या जबरदस्त प्रदर्शन करत आहे. हिमा दासने आपला विजयाचा धडाका सुरु ठेवला असून १५ दिवसांत चौथ्या सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. चेक गणराज्य येथे सुरु असलेल्या टाबोर अॅथलेटिक्स टूर्नामेंट (Tabor Athletics Meet in Czech Republic)मध्ये २०० मीटरच्या शर्यतीत हिमा दासने सुवर्ण पदक पटकाविले. ही शर्यत हिमाने केवळ २३.२५ सेकंदात पूर्ण केली.

पुरुष वर्गात मोहम्मद अनस यांनी ४०० मीटरची शर्यत ४५.४० सेंकदात पूर्ण करून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. अनस यांनी याच स्पर्धेत १३ जुलै रोजी ४५.२१ सेंकदात शर्यत जिंकून सुवर्णपदक पटकविलं होते.

दरम्यान, पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमाने महिलांच्या २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत असलेल्या हिमाने २३.६५ सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तीने कुंटो ऍथलेटिक्‍स स्पर्धेत २३.९७ सेकंदाची वेळ नोंदवून एका सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच रविवारी हिमाने २३.४३ सेकंदाच्या वेळेसह आणखी एक सुवर्णपदक नावावर केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.