तुळजापूरात देवीची रथ अलंकाराची महापूजा

उस्मानाबाद : शारदीय नवरात्रोत्सवास सुरूवात झाली असून देशभरात विविध रुपातील देवीची पुजा भाविक मनोभावे करत आहेत. त्यातच राज्यातही नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहचताना दिसत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मंदिरात देवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.

भगवान सूर्यनारायणांनी तुळजाभवानी देवीला त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ दिला. त्याची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा बांधली जाते. दरम्यान, ही पुजा झाल्यानंतर देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.