पुण्याचं वैभव असलेला ‘शनिवार वाडा’ झाला २८९ वर्षांचा

पुणे – पुण्याचं वैभव असलेल्या शनिवारवाड्याचा आज (दि. २२) २८९ वा वर्धापन दिन आहे. हे औचित्य साधत थोरले बाजीराव प्रतिष्ठान तर्फे शनिवारवाड्याचा ‘दिल्ली दरवाजा’ खुला करण्यात आला. दोन तासांसाठी हा दरवाजा उघडण्यात येतो. एरवी दिल्ली दरवाजा बंद असतो.

त्यातील छोटा दरवाजा मधून नागरिकांना शनिवारवाड्यात प्रवेश दिला जातो. दरम्यान, यावेळी हा भव्य दरवाजा उघडतानाचे दृश्य पाहण्यास पुणेकरांनी आणि पर्यटकांनी गर्दी केली .

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.