वडिलांचे निवडणूक जिंकण्याचे स्वप्न मुलींनी केले पूर्ण

पिरंगुट – आपणही निवडून यावे अन्‌ जनसेवा करावी, अशी घोटावडे (ता. मुळशी) येथील भाजपचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र देवकर यांची कायमच इच्छा होती. मात्र निवडणुकीत त्यांना यश आले नाही. यावर्षीही ते पराभूत झाले; पण त्यांच्या दोन्ही मुलींनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयश्री खेचत आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. 

रामचंद्र देवकर अनेक वर्ष घोटावडे परिसरात सामाजिक कार्य करत आहेत. त्यांची पत्नी शिवकन्या देवकर यांनी शिवसेनेकडून, तर रामचंद्र देवकर यांनी भाजपकडून पंचायत समितीची निवडणूकही लढविली होती; पण दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला.

जनमानसातून निवडून येण्याचे त्यांचे स्वतःचे स्वप्नही अनेकवेळा अपूर्ण राहिले. मात्र, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही; पण रामचंद्र देवकर यांच्या दोन्ही मुली वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेल्या आहेत.

एक कन्या सोनाली देवकर-मातेरे या घोटावडे ग्रामपंचायतीत, तर मोनाली देवकर ढोरे या पौड (ता. मुळशी) ग्रामपंचायतीत निवडून आल्या. मतमोजणी वेळी विजयी घोषित झाल्यानंतर सोनाली यांना आपले अश्रू आवरता आले नाही, तर मोनाली यासुद्धा पती सागर ढोरे यांचा गेल्यावेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढत निवडून आलेल्या आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.