पुणे : घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेल्याप्रकरणात 19 वर्षीय मुलगी स्वत:हून न्यायालयात हजर झाली. तिला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.सुपेकर यांनी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला. भाग्यश्री परिहार (रा. चिंचवड) असे तिचे नाव आहे.
बचाव पक्षातर्फे ऍड. श्रीकृष्ण घुगे यांनी काम पाहिले. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल आहे. 20 जून रोजी ती 1 लाख 30 हजार रुपये रोख आणि आणि दागिने मिळून 3 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज घेऊन लंपास झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात ती स्वत: न्यायालयात हजर झाली. त्यावेळी ती सज्ञान असून, तिने पळून जावून आंतधर्मीय विवाह केला आहे. त्यामुळे तिच्यावर चोरीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा युक्तीवाद ऍड. श्रीकृष्ण घुगे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने याबाबत आदेश दिला.