सर्वसामान्य बहुजन जनता माझ्यासोबत- घनश्‍याम हाके

हडपसर  – सत्ताधारी लोकप्रतिनिधींची खोटी आश्‍वासने, त्याला होणारा अल्पसा विरोध या साऱ्यांचा फुगा आता फुटणार आहे. कारण, प्रचारादरम्यान वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता सर्वसामान्य बहुजन जनता माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहे, असा विश्‍वास हडपसर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्‍याम बापू हाके यांनी व्यक्त केला.

हाके यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत प्रचाराची सांगता केली. यावेळी आतिष आल्हाट, अभिजीत टकले, विकी चाकरे,धर्मवीर क्षीरसागर, संतोष ढगरे, पराग बरडे, प्रवीण करे यांच्यासह वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अच्छे दिनचे स्वप्न दाखवत भाजप-सेना युतीने सत्ता मिळविली, मात्र हे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. सरकारने अनेक योजनांची पोकळ आश्‍वासने दिली. शेतकरी-शेतमजूर, कामगार, छोटे व्यावसायिक, शिक्षक, डॉक्‍टर अशा सर्वच घटकांत सत्ताधारी सरकारबद्दल नाराजी आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी विरोधकही कमी पडले आहेत. त्यामुळे आता जनतेला वंचित बहुजन आघाडी हा उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने मला माझ्या विजयाची खात्री आहे, असा विश्‍वास हाके यांनी व्यक्त करत गॅस-सिलिंडर चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.