गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल तीन तास लवकर संपली

पुणे – पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक यावर्षी तब्बल तीन तास लवकर संपली. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पुन्हा सुरू झालेली मिरवणूक नऊच्या सुमारास मंदावली होती. मात्र पोलिसांनी स्पीकर बंद केल्यामुळे तसेच मंडळांना गतीने मिरवणूक पुढे नेण्याचे आवाहन केल्याने, सकाळी सव्वा दहाच्या सुमारास टिळक चौकातून सर्व मंडळ मार्गस्थ झाली होती.

त्यानंतर साडेदहा वाजता पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल तीन तास आधी मिरवणूक संपल्याचे जाहीर केले. मंडळांनी केलेले सहकार्य आणि पोलिसांनी नियोजनात केलेल्या बदलामुळे यावर्षी लवकर मिरवणूक संपल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान किरकोळ वाद वगळता मिरवणूक निर्विघ्न पार पडली. मिरवणूकीदरम्यान 60 मोबाइल जप्त करण्यात आले तर ५० जणांना ताब्यात घेण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here