Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

अबाऊट टर्न : खेळ

- हिमांशू

by प्रभात वृत्तसेवा
June 13, 2022 | 5:30 am
A A
अबाऊट टर्न : खेळ

खेळ झालाय सगळा… खेळ! जगण्याचा, मरण्याचा, नात्याचा, रक्‍ताचा अन्‌ रक्‍ताच्या नात्याचा! पोरं जिच्या पोटात नऊ महिने वाढतात, तिलाच गोळ्या घालून मारू शकतात आणि ती रागावल्याचा राग मनात धरून तिच्याच नावाने “सुसाइड नोट’ लिहून स्वतःचाही जीव घेऊ शकतात. कशासाठी? पाच-सहा इंचाच्या स्क्रीनसाठी? तो स्क्रीन हातात नव्हता तेव्हाही जीवन सुरळीत चाललं होतं आणि आताही तो दूर ठेवल्यास फारसं काहीच बिघडणार नाहीये. 

आई नसली तर मात्र सगळंच बिघडणार आहे… आणि जीवनच संपलं तर तो काळा स्क्रीन काय चितेत टाकायचा? इतकाही विवेक शिल्लक राहू नये, असलं कसलं हे नवं व्यसन? खेळाचं? जिंकण्याचं? आणि या व्यसनापायी एका सैनिकाच्या सोळा वर्षांच्या पोरानं वडिलांची पिस्तूल घेऊन सहाच्या सहा गोळ्या आईच्या छातीत घुसवाव्यात? लखनौमधल्या या घटनेनं काळजाचा थरकाप वगैरे उडाला असेल, तर थोडं थांबा! अशी घटना आपल्याही घरात घडू शकते असा विचार करून आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य खरोखर कळलंय का, हा प्रश्‍न स्वतःला विचारा.

एक सैनिक बंदूक घेऊन सीमेवर शत्रूला रोखून धरतो; पण सीमा नसलेला शत्रू त्याच्याच घरात घुसतो, तेव्हा नव्यानं सीमा आखायला नकोत का? बंदी घातलेल्या गेम्स डाउनलोड होतातच कशा? या प्रश्‍नाचं उत्तर ना जिंकण्यासाठी धावणाऱ्या आईवडिलांकडे आहे, ना जिंकण्यासाठी धावणाऱ्या राजकारण्यांकडे!

आईला ठार करणाऱ्या पोरानं तिचा मृतदेह तीन दिवस बंदिस्त करून ठेवला आणि लहान बहिणीलाही धमकावून कोंडून ठेवलं. दुर्गंधी वाढली तेव्हा स्वतःच वडिलांना व्हिडिओ कॉल करून आईचा मृतदेह दाखवला. बंगालमध्ये ड्युटीवर असलेल्या वडिलांनी तत्काळ एका नातेवाइकाला लखनौच्या घरी पाठवलं. घाबरलेल्या अवस्थेत सडलेल्या मृतदेहाला बिलगून पहुडलेली दहा वर्षांची मुलगी पाहून पोलिसांनाही धक्‍का बसला. परंतु सरकारने सप्टेंबर 2020 मध्ये बंदी घातलेला “पब्जी’ अजून डाउनलोड होतो, हा त्याहून मोठा धक्‍का आहे. अर्थात, एक “पब्जी’ गेला तर हजार नवे येतील. त्यांना रोखण्यासाठी मजबूत कायदा आणि त्याहून मजबूत निर्धाराची गरज आहे.

वास्तवात जगायला पोरांना शिकवलंच नाही तर त्यांच्या हातून मोबाइल हिसकावून काय होणार? मुंबईत घडलं तेच! पोरानं आईच्या नावानं “सुसाइड नोट’ लिहिली आणि अंधेरी-मालाडदरम्यान लोहमार्गावर पोराचा मृतदेहच सापडला. मरण्या-मारण्यास तयार होण्याइतपत आक्रमक बनवणारे हे “खेळ’ टिकून तरी कसे राहतात आणि इतके फोफावतात तरी कसे? स्वतःशी आत्यंतिक प्रामाणिकपणे बोलल्याखेरीज या प्रश्‍नाचं उत्तर सापडेल का? लहान वयातसुद्धा मोबाइल हाताळण्याच्या “कौशल्या’चं तोंडभरून कौतुक करणारे आणि नंतर गेम्सच्या नावानं गळा काढणारे लबाड, ढोंगी लोक आहोत आपण!

रक्‍ताच्या नात्याचे लोक पोरांना वास्तव पाहायला शिकवत नाहीत आणि दुनिया ज्याला वास्तव शिकवते त्याला रक्‍ताचं कुणीच नसतं. म्हणूनच बेरोजगारीला कंटाळून पुण्याजवळ आत्महत्या करणाऱ्या केरळच्या तरुणाची “सुसाइड नोट’ खडबडून जागं करते. तो लिहितो, “माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण माझ्या मरणानंतर शोक करणारं कुणीच नाही…’ स्वीकारा अथवा नाकारा; वास्तव हेच आहे. जगण्याचा “खेळ’ सोपा नाही… त्याचं शिक्षण आणि बळ आईवडीलच देऊ शकतात… काळा स्क्रीन नव्हे!

Tags: blood and blood relationshipdyingeditorial page articlelivingrelationship

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : हाच का आपला पुरोगामी महाराष्ट्र?
Top News

अग्रलेख : हाच का आपला पुरोगामी महाराष्ट्र?

12 hours ago
लक्षवेधी : अखिलेश यांनी टोपी फिरवली!
Top News

लक्षवेधी : अखिलेश यांनी टोपी फिरवली!

12 hours ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : फंड, पेन्शन यावर जप्ती आणता येणार नाही
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : 18 मीटर लांबीची बस

13 hours ago
अग्रलेख : एकत्रित निवडणुकांची रणनीती
Top News

अग्रलेख : एकत्रित निवडणुकांची रणनीती

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोबाइल चोरण्यास प्रवृत्त कणारा सराईत जेरबंद

राहुल गांधींची खासदारकी जाताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ओबीसी समाजाबद्दल…”

BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया

जय झुलेलालच्या जयघोषात चेटीचंड उत्सव उत्साहात

Rahul Gandhi disqualified : अशोक चव्हाणांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या..”

राहुल गांधींची खासदारकी का केली ? ‘जाणून घ्या’ याचिकाकर्ते पूर्णेश मोदी आहेत तरी कोण.. भाजपशी कसे आहे कनेक्शन ?

अन्यथा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करणार – अजित गव्हाणे

Rahul Gandhi disqualified : गरज पडली तर लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगातही जाऊ – मल्लिकार्जुन खर्गे

देहूरोडच्या रेडझोनबाबत लवकरच बैठक

आधी दोन वर्षांची शिक्षा; आता खासदारकी देखील झाली रद्द.. राहुल गांधी मोदी आडनावाबाबत नेमकं काय म्हणाले होते पहा तो VIDEO

Most Popular Today

Tags: blood and blood relationshipdyingeditorial page articlelivingrelationship

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!