नवाजुद्दीन सिद्दीकी, तमन्ना भाटिया, कबीर दुहन सिंग आणि राजपाल यादव सध्या राजस्थानमधील मांडवा येथील हेरिटेज रिसॉर्टमध्ये ‘बोले चुडिया’ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. त्यांनी ह्या चित्रपटाची शूटिंग १ ऑगस्टपासून सुरू केले असून तब्बल ४५ दिवसांचे त्यांचे शेडूल आहे. शूटिंग करताना कलाकार खूप मजा मस्ती करत आहेत आणि कास्ट आणि मेकर्स च्या सोशल मीडियावर ह्या सर्व गोष्टींची झलक दिसून येतेय.
अलीकडेच सोशल मीडियावर नवाजुद्दीनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो झोपाळ्या चा आनंद घेत असल्याचे दिसून आले. फोटोला कॅप्शन देण्यात आले होते, “आनंदाचे क्षण – लहानपणापासून जीवन जगणारे.” सोशल मीडियावर शेअर केलेला आणखी एक व्हिडिओ मध्ये स्विमिंग पूल शेजारी मुख्य कलाकार गाण्या च्या शूटिंग मध्ये व्यस्त असलेल्याचा होता.