कोल्हापूर – कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी विठ्ठल आटुगडे हा फरार झाला होता. आपत्कालीन कारागृहातील गेटचे काम करताना तो पळून गेला. यावेळी त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर त्याने दगडफेक केली.
त्यानंतर पलायन केलेल्या कैद्यास शेंडा परिसरातून कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या अर्ध्या तासात गजाआड केले आहे. निर्जनस्थळाचा आधार घेत शहराबाहेर पडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कैद्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पळण्याचा प्रयत्न फसलेला विठ्ठल आटुगडे हा कैदी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याल मेनी गावाचा रहिवाशी आहे.