मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने अनेक राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..जय महाराष्ट्र…”,अशा शब्दात राऊत यांनी राज ठाकरे यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे @RajThackeray यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
जय महाराष्ट्र pic.twitter.com/IfV32Cfac6— Sanjay Raut (@rautsanjay61) June 14, 2020
संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक असले तरीही त्यांचे राज ठाकरे यांच्याशी पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत. राऊत यांनी सामनातून राज ठाकरे आणि मनसेवर अनेकदा बोचऱ्या शब्दात टीकाही केली आहे. मात्र, असं असलं तरीही या दोन्ही नेत्यांमधील मैत्री कमी झालेली नाही. हेच आजच्या ट्वीटवरुन दिसून आलं.