पॅरिस – करोनाचा धोका अद्याप कायम असली तरीही यंदा फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा होणार असल्याची ग्वाही आयोजकांनी दिली आहे. मात्र, या स्पर्धेतील सामने शटडाऊनमध्ये म्हणजेच एकाही प्रेक्षकाला प्रवेश न देता खेळविले जाणार आहेत.
करोनाच्या संकटामुळे टोकियो ऑलिम्पिक, विम्बल्डन टेनिस या स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून पुढील वर्षी या स्पर्धा होणार आहेत. मूळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 24 मे ते 7 जून या कालावधीत होणार होती. त्यात बदल करण्यात आला असून नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा आता 20 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.