तिरुचिराप्पल्ली: चार दिवसांपासून बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याची झुंज आज अखेर अपयशी ठरली. बोअरवेलमध्ये अडकलेला सुजीत विल्सन मृतदेह पहाटेच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. सुजीतच्या सुखरूप सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रार्थना केली होती.
Tiruchirappalli: Body of 2-year-old #SujithWilson who lost his life after he fell into a borewell on October 25, brought to Pudur for cremation. #TamilNadu https://t.co/h9Q9z0Cn0k pic.twitter.com/4B5QAacdWn
— ANI (@ANI) October 29, 2019
तामिळनाडूच्या तिरुचिराप्पल्ली जिल्ह्यातील गावात सुजित विल्सन २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बोरवेलमध्ये पडला. आणि ३० फूट खोल अडकला. त्याच्या बचावासाठी चार दिवसांपासून अथक प्रयत्न सुरू होते. यासाठी बोअरवेलजवळ ६० फूट खड्डा खोदण्यात आला होता. परंतु, त्यानंतर रात्री तो सुमारे १०० फूट आणखी खाली सरकत गेला.
TN: 2-yr-old Sujith Wilson found dead in borewell, body taken to hospital
Read @ANI Story | https://t.co/p2nWP7pmob pic.twitter.com/miCndvUKFJ
— ANI Digital (@ani_digital) October 29, 2019