कॅनवेराल (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संस्था “नासा’ने सोमवारी आपल्या पहिल्या चांद्रमोहिमेसाठी 4 अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली. पुढच्या वर्षाच्या अखेरीपर्यंत हे अंतराळवीर चंद्रावरील मोहिमेसाठी रवाना होणार आहेत. या चौघांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. यातील तिघेजण अमेरिकेचे आणि एक जण कॅनडाचा अंतराळवीर आहे. ह्युस्टन येथील समारंभात या चारही अंतराळवीरांचा परिचय करून देण्यात आला.
रिड व्हाईसमॅन हे या मोहिमेचे प्रमुख असतील. त्यांच्याबरोबर व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टियाना कोच आणि कॅनडाचे जेरेमी हॅनसेन हे या मोहिमेतील सदस्य असणार आहेत.
हे चारही अंतराळवीर “नासा’च्या ओरियन कॅप्स्यूलमधून चांद्रमोहिमेवर जाणार आहेत. ही कॅप्स्यूल पुढील वर्षाच्या उत्तरार्धात केनेडी स्पेस सेंटरमधील स्पेस लॉंच सिस्टीमद्वारे प्रक्षेपित केली जाणार आहे. हे अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार नाहीत. तसेच ते चंद्राच्या कक्षेमध्येही जाणार नाहीत.
#IPL2023 : आयपीएल स्पर्धेवर करोनाचे सावट, कमेंटेटर आकाश चोप्रा COVID-19 पॉझिटिव्ह
चंद्राच्या भोवती प्रदक्षिणा घालून ते परत पृथ्वीवर येणार आहेत. त्यानंतर अन्य दोन अंतराळवीर चंद्रावर उतरण्यासाठी रवाना होतील. त्या मोहिमेची ही पूर्वतयारी असणार आहे. गेल्या वर्षी ओरियनची रिकामी कॅप्स्यूल चंद्रावर पाठवून परत आणण्यात आली. 2024 च्या मोहिमेची ती रंगीत तालीम होती. 1968 च्या अपोलो मोहिमेपासून 1972 पर्यंत “नासा’ने 24 अंतराळवीरांना चंद्रावर पाठवले आहे. त्यातील 12 जण चंद्रावर उतरले आहेत.