अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री 25 जूनपासून भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली -अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मायकेल पॉम्पिओ पुढील आठवड्यात भारताच्या तीनदिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी ते 25 जूनला येथे दाखल होतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत दौऱ्यावर येणारे पॉम्पिओ हे पहिले परदेशी उच्चपदस्थ ठरणार आहेत.

ते परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्या चर्चेत द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे उपस्थित होतील. भारत आणि अमेरिकेतील संबंध आणि सहकार्य वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने पॉम्पिओ यांचा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.

जपानमध्ये 28 आणि 29 जूनला जी-20 परिषद होणार आहे. त्या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. त्याआधी पॉम्पिओ यांचा दौरा होत असल्याने त्याचे महत्व वाढले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.