नवी दिल्ली – बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या हिममानवाबाबत कथेत अथवा चर्चेमधून ऐकले असेल. परंतु, पहिल्यांदाच हिममानव अस्तित्वात असल्याची शक्यता भारतीय सैन्याने अधिकृतपणे वर्तवली होती. हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलांच्या ठशांचे फोटो भारतीय सैन्याने ट्विटरद्वारे प्रसिद्ध केले होते. या ट्विटनंतर जगभरात येतीविषयी चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु,ते हिममानवाच्या पावलांचे ठसे नसून जंगली अस्वलांच्या पाऊलखुणा नेपाळ सैन्याने शक्यता वर्तवली आहे.
भारतीय सैन्याच्या पथकाला ९ एप्रिल रोजी मकालू बेस कॅम्प येथे रहस्यमय पावलांचे ठसे आढळले. नेपाळ-चीन सीमेजवळचा हा परिसर आहे. हे ठसे मानवी पावलासारखे दिसत असले तरी त्यांचा आकार ३२ X १५ इंच इतका होता. मात्र, हे ठसे फक्त एकाच पायाचे होते. हे हिममानवाच्या पावलांचे ठसे असल्याची शक्यता सैन्याने वर्तवली होती. हा हिममानव याआधी केवळ मकालू-बरुन नॅशनल पार्कमध्ये दिसला होता, असे लष्कराने ट्विटमध्ये म्हटले आहे. परंतु, आता नेपाळ सैन्याच्या प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल बिज्ञान देव पांडे म्हणाले, आमची टीम भारतीय टीम सोबतच होती. आम्ही त्या पावलांचा तपास करण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्थानिक लोकांनी ते निशाण जंगली अस्वलाचे असल्याचे म्हंटले आहे. जंगली अस्वल अनेकदा या भागात दिसून येतात, असे त्यांनी सांगितले.
For the first time, an #IndianArmy Moutaineering Expedition Team has sited Mysterious Footprints of mythical beast 'Yeti' measuring 32×15 inches close to Makalu Base Camp on 09 April 2019. This elusive snowman has only been sighted at Makalu-Barun National Park in the past. pic.twitter.com/AMD4MYIgV7
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) April 29, 2019