पुणे : खडकवासला धरणातून 45 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर, शहरातील नदीकाठच्या नागरिकांनी रविवारची रात्र जागून काढल्यानंतर, सोमवारचा दिवस नागरिकांसाठी आणखी त्रास वाढविणारा ठरणार आहे. खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग सकाळी 11 वाजता 49 हजार 300 क्यूसेक करण्यात येणार असल्याने, शहरात घुसलेल्या पाण्याची व्याप्ती आणखी वाढणार असून नदीकाठी आणखी नागरिक बाधित होण्याची भीती आहे.
दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसारण्यास तयार नसल्याचे चित्र असून गेल्या 24 तासात खडकवासला धरणात 71 मी, पानशेत वरसगाव धरणात 134 मिमी तर टेमघर धरानात तब्बल 176 मिमी पाऊस झाला असून टेमघर धरणही 95 टक्के भरले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.