सातारा – सदर बाझारमध्ये असणाऱ्या भारत माता चौकातील एका फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी 8 लाख 50 हजार रुपये किमतीचे 22 तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान, याच परिसरात कालच चोरट्यांनी घरफोडी करून 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केले होते. सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, नीलेश सुरेशराव सरनाईक (वय 37, मूळ राहणार कोल्हापूर, सध्या राहणार समर्थ प्लाझा, सदर बझार) हे पत्नी वृषाली सरनाईक आणि दोन मुलांसमवेत भाड्याने राहतात. नीलेश सरनाईक हे मुथा कंपनीमध्ये काम करत असून पत्नी ऋषाली या गृहिणी आहेत. त्यांचा एक मुलगा येथील निर्मल कॉन्व्हेंट तर दुसरा मुलगा शाहू ऍकॅडमी येथे शिक्षण घेत आहेत.
गुरुवारी सकाळी नीलेश हे मुलांना शाळेत सोडून कंपनीमध्ये गेले. वृषाली या सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून मुलांना शाळेतून घरी आणण्यास गेल्या. मुलांना शाळेतून घेऊन त्यांनी एका हळदी कुंकू समारंभाला उपस्थिती लावली, तेथून त्या 12 वाजण्याच्या सुमारास फ्लॅटवर आल्या असता अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी घरात जाऊन बेडरूमची पाहणी केली असता बेडरूममध्ये असलेली तिजोरी फोडून त्यामधील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही बाब पती नीलेश सरनाईक यांना मोबाईलवरून सांगितली. नीलेश सरनाईक तात्काळ फ्लॅटवर दाखल केले त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन फ्लॅटची पाहणी करुन घटनास्थळाचा पंचनामा केला.
थोड्या वेळाने दोशी हे पाहुण्यांचा फोटो मोबाइल कॅमेऱ्याने काढण्यासाठी स्टेजवर गेले होते. त्यावेळी दोशी यांनी दागिने असलेली पर्स साऊंड सिस्टीमच्या बॉक्सवर ठेवली होती. ते फोटो काढत असताना पाच ते सात मिनिटांत पर्स गायब झाली होती. दोशी यांनी कार्यालयात शोध घेऊनही पर्स सापडली नाही. चोरट्याने पर्समधील दहा तोळे सोन्याचे दागिने व रोकड मिळून दोन लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद दोशी यांनी आज दिली.