मुंबई | शहरातील टाटा कॅन्सर रुग्णालयात देशभरातून अनेक नागरिक उपचारासाठी येतात. या रुग्णांच्या नातेवाईकांची मुंबईत राहण्याची अडचण दूर व्हावी यासाठी गृहनिर्माण विभागाने हाजी कासम चाळीतील म्हाडाच्या शंभर सदनिका देण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र स्थानिकांनी याबाबत आक्षेप घेतला असता त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली व तात्काळ पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार बॉम्बे डाइंग येथे असलेल्या म्हाडा इमारतींमध्ये एकत्रितरित्या 100 सदनिका प्राप्त झाल्या आहेत. या सदनिका टाटा रुग्णालयाला देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.