मुंबई – आदिपुरुष हा चित्रपट टिझर रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात प्रभासचा राम आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसल्याने चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. एवढ्यावरच न थांबता हनुमानाचा लूकही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. या चित्रपटात एका मराठी अभिनेत्याने बजरंगबलीची भूमिका साकारली आहे. मराठमोळा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘दवदत्त नागे’ आहे. हनुमानाच्या भूमिकेमुळे हा अभिनेता ट्रोल होत असला तरी फॅन्स याच्या फिटनेसचे दिवाने झाले आहेत.
देवदत्त नागे ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषमध्ये हनुमानाची भूमिका साकारत आहे.यापूर्वी तो अनेक सिनेमाद्वारे आणि टीव्ही मालिकांद्वारे घरा घरात पोहचलेला आहे. देवदत्तने ‘जय मल्हार’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेत भगवान खंडोबाची भूमिका साकारली होती, ज्याचे खूप कौतुक झाले होते.देवदत्तने सत्यमेव जयते आणि वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या हिंदी चित्रपटांमध्येही छोटी भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
हनुमानाच्या लूकवर देवदत्त ट्रोल झाला असला तरी त्याच्या फिटनेसचे लोक कौतुक करत आहेत. देवदत्त नियमित जिम करतो. सोशल मीडियावर त्याचे वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो तो नेहमीच शेअर करत असतो.खंडोबाच्या भूमिकेत प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिले होते. आता पुन्हा एकदा बजरंगबलीच्या भूमिकेत तो आपले अभिनयाचे वजन सर्वांसमोर प्रदर्शित करणार आहे. सध्या या चित्रपटावरून वाद सुरू आहे. 12 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.