“नासा’पाठवणार चंद्रावर पहिली महिला

वॉशिंग्टन- चंद्रावर मानवाचे पाऊल पडल्याच्या ऐतिहासिक घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता अमेरिकेची अंतराळ संशोशन संस्था “नासा’ ने आणखी एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर प्रथम महिला आणि भविष्यात माणूसाची चाल घडवून आणण्याचा कार्यक्रम “नासा’ राबवणार आहे. “आर्टेमिस’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. सूर्यदेवता अपोलोच्या जुळ्या भगिनीच्या नावावरून हे नाव या मोहिमेला देण्यात आले आहे. ही देवता ग्रीक चंद्रदेवत म्हणून ओळखली जाते.

“चंद्रावर पुन्हा एकदा मानवाला पाठवण्याची ही मोहिम आहे. याच मोहिमेतून मंगळावरील मोहिमेची पूर्वतयारी केली जाईल. चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीतून मंगळावरच्या मोहिमेला चालना मिळेल.’ असे “नासा’ने म्हटले आहे. चंद्रावर पुन्हा एकदा मानव पाठवण्याची “नासा’ची ही पुढची मोहिम 2024 साली होणार आहे. “आर्टिमिस’ कार्यक्रमाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवून परत येणारी पहिली महिला आणि भविष्यातील मानव मंगळ मोहिमेला दिशादर्शक ठरतील, असे “नासा”ने म्हटले आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावरील पाणी, बर्फ आणि अन्य नैसर्गिक स्रोतांचा शोधही घेतला जाणार आहे. चंद्रावरील अधिक पृष्ठभागाचे परीक्षण “नासा’ करणार आहे. चंद्राशी संबंधित असलेली अनेक गूढ रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न आणि तेथे तंत्रज्ञानाचे प्रयोगही केले जाण्र आहेत. या तंत्रज्ञानाच्या प्रयोगांद्वारे सौर व्यवस्थेमधील मानवाचे अस्तित्व अधिक घनिष्ठ बनणार आहे. चंद्रावरील मोहिम ही केवळ एक लक्ष्य असणार नाही. तर तंत्रज्ञान, विज्ञान आणि मानवी संशोधन सिद्ध करण्याची संधी असेल. मंगळावरील मोहिमेसाठी हे तंत्रज्ञान महत्वाचे असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)