नीरा -नीरा (ता. पुरंदर) येथील व्यक्तीचा म्युकरमायकोसिस आजाराने पहिला बळी घेतला. मागील महिन्यात (दि.23) जुलै रोजी या रुग्णाचा अहवाल करोनाबाधित आला होता.
यानंतर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारानंतर त्यांना बाधा झाल्याचे निदान करण्यात आले होते. पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवार (दि.11) मृत्यू झाला आहे.
करोनाबाधित अहवाल आल्यानंतर अवघ्या 20 दिवसांत या रुग्णाचा म्रुत्यू झाल्याने घबराट पसरली आहे. नीरेतील हा पहिला बळी आहे. पुरंदर तालुक्यात सासवड नगरपालिका क्षेत्रातील 2, ग्रामीण भागातील कोळविहिरे येथील 1 व
आता नीरा येथील एकजण, असे एकूण 4 जणांचा आतापर्यंत म्युकरमायकोसिसने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दिली आहे.
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शहरात आतापर्यंत 970 व्यक्ती बाधित झाले असून 896 व्यक्ती करोनावर मात करुन घरी परतले आहेत. 18 लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर 56 रुग्ण विविध कोविड केअर सेंटर व रुग्णालयात उपचार घेत आहेत.