– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – वडगाव पाटोळे (ता. खेड) येथील करोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. खेड तालुक्यातील करोना विषाणू संसर्गाचा हा पहिला बळी आहे.
वडगाव नजीक (वडगाव पाटोळे), ता खेड येथील ५८ वर्षीय करोना बाधित रुग्ण पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात १२ दिवसांपासून उपचार घेत होता. त्याचा रात्री उपचारादारम्यान मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील करोनामुळे हा पहिला बळी आहे.
तालुक्यात करोना पॉझिटिव्हचे एकूण २८ रुग्ण झाले होते. त्यापैकी 5 जण बरे होऊन घरी आले आहेत तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित २२ जणांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. सर्व रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे डॉ. गाढवे यांनी सांगितले.