ढेबेवाडी पाटण मार्गावरील मालदन पूल 2006 नंतर यंदा पहिल्यांदाच पाण्याखाली गेल्याने नागरिकांची पूर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मालदन ते ढेबेवाडी हा पूल गेल्या बारा वर्षात यंदा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असल्याची चर्चा यावेळी होती. पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
कोपर्डे हवेलीत टॅंकरने पाणी पुरवठा
कोपर्डे हवेली ता. कराड येथील नळपाणी पुरवठा योजना कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून टॅंकरने गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून नळपाणी पुरवठा योजना पाण्याखाली आहे. ग्रामपंचायतीने शिल्लक पाण्याचा पुरवठा योग्य पध्दतीने केल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाई जाणवली नाही