मिशन शक्ती वर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया 

नवी दिल्ली – भारताने आज अंतराळातील कृत्रिम उपग्रहावर अचूक निशाणा साधत, अंतराळातील कृत्रिम उपग्रहांवर निशाणा साधण्याची क्षमता असणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीमध्ये आपले नाव कायम केले. अशी कारवाई करण्याची क्षमता आत्तापर्यंत केवळ अमेरिका रशिया आणि चीन या देशांकडे होती मात्र भारताने आज मिशन शक्तीच्या जोरावर भारतही अशी कारवाई करण्यामध्ये तत्पर असल्याचे जगाला दाखवून दिले.

MEA on A-SAT: Test isn’t directed against any country. India’s space capabilities don’t threaten any country nor are they directed against anyone. At the same time, govt is committed to ensuring country’s national security interests&is alert to threats from emerging technologies.

— ANI (@ANI) March 27, 2019

दरम्यान मिशन शक्ती बाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत वक्तव्य करण्यात आले असून याद्वारे परराष्ट्र मंत्रालयाने भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. “भारताद्वारे करण्यात आलेली अँटी सॅटेलाइट चाचणी ही कोणत्याही देशा विरोधात नसून भारताने ही चाचणी स्वसंरक्षणासाठी केली आहे. या चाचणीतून भारताचा कोणत्याही देशाला भयभीत करण्याचा इरादा नाही. भारताने आज अँटी सॅटेलाइट चाचणी करत भारताच्या वाढत्या कृत्रिम उपग्रहांचे संरक्षण करण्यास भारत तत्पर असल्याचे दाखवून दिले आहे.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)