“तेजस एक्‍स्प्रेस’ होणार रेल्वेची पहिली खासगी ट्रेन 

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने तेजस एक्‍स्प्रेस खासगी करण्यासाठी आणखीन एक पाऊल पुढे टाकले आहे. दिल्ली-लखनऊ तेजस एक्‍स्प्रेस पहिली अशी ट्रेन असेल ज्याचे ऑपरेटिंग खासगी कंपनीच्या हाती असेल. सुत्रांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे. आता केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणासाठी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे दिल्लीहून लखनऊला जाणारी तेजस एक्‍स्प्रेस ही भारत देशातली पहिली खासगी ट्रेन ठरेल.

रेल्वेने या ऑपरेशनसाठी खासगी कंपनीकडे दोन गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच रेल्वेने खासगी कंपन्यांना 100 दिवसांचा अजेंडा सादर केला. रेल्वे बोर्ड अशा दुसऱ्या मार्गावर विचार करत आहे. तो मार्ग सुद्धा 500 किलोमीटरच्या दूरचा पल्ला असेल. या रेल्वेसंबंधीच्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय 10 जुलैपर्यंत होणार असल्याची माहिती आयआरसीटीसीने दिली.
रेल्वे बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली-लखनऊ रेल्वेमार्गावर हा असा एक मार्ग आहे जिथे रेल्वे चालवण्याकरिता खासगी ऑपरेटर्सचा विचार रेल्वेकडून केला जात आहे. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, एका महिन्यात यावर निर्णय घेण्यात येईल.

आयआरसीटीसी या निर्णयाच्या स्वरूपावर सध्या काम करत आहे. तर, पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने 100 दिवसांच्या अजेंडाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली असून याच्या सुरूवातीच्या काळात देशात दोन खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वे खासगीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले होते. रेल्वेचे खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकार आक्रमक झाले आहे. तरी सुद्धा या निर्णयाला आम्ही विरोध करू, असे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेन (एनएफआयआर)ने म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×