नवी दिल्ली : भारताचे मून स्पेसक्राफ्ट चांद्रयान-2 ने अंतराळातून पृथ्वीचे पहिले छायाचित्र पाठवले आहे. इस्रोने याविषयी एक ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे.
ISRO (Indian Space Research Organisation): Earth as viewed by #Chandrayaan2 LI4 Camera on August 3, 2019. pic.twitter.com/QKU9iL8O8m
— ANI (@ANI) August 4, 2019
दरम्यान, शुक्रवारीच चांद्रयान -2 ने आपली कक्षा बदलली. चौथ्यांदा चांद्रयानाने आपली कक्षा बदलली असून प्रत्येकवेळी चांद्रयानाला नवीन ऊर्जा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कक्षा वाढण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान-2 मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता पुढचा कक्षा बदलाचा टप्पा 6 ऑगस्टला होणार आहे.