अयोध्या रेल्वे स्थानकाच्या सुधारणेचा पहिला टप्पा जून पर्यंत पुर्ण होणार

नवी दिल्ली – अयोध्येच्या रेल्वे स्थानकाच्या सुधारणेचा प्रकल्प रेल्वेने हाती घेतला असून त्याचा पहिला टप्पा पुढील वर्षी जून मध्ये पुर्ण होणार आहे. या स्थानकाला राम मंदिराचा लूक दिला जाणार आहे. रामजन्म स्थळावर येणाऱ्या प्रवाशांना या स्थानकावर अत्याधुनिक सुविधा दिल्या जाणार आहेत. अशी माहिती उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव चौधरी यांनी दिली.

या रेल्वे स्थानकाच्या सुधारणांच्या प्रस्तावाला सन 2017-18 मध्ये मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 80 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रेल्वे स्थानकाच्या संपुर्ण नुतनीकरणासाठी एकूण 104 कोटी रूपये खर्च येणार आहे.

पहिल्या टप्प्याच्या कामाबरोबरच दुसऱ्या टप्प्याचेही काम हाती घेण्यात आले आहे. या स्थानकाच्या इमारतीचे बांधकाम एकूण एक लाख चौरस फुटांवर असेल आणि त्याच्या छतावर मंदिराच्या शिखरासारखी उभारणी केली जाईल त्यामुळे स्थानकाला मंदिरासारखा लूक मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.