नारायणगाव सेंटरमधून पहिला रुग्ण घरी परतला

नारायणगाव- नारायणगाव ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटरमधील पहिला बरा झालेल्या रुग्णाला वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी

टाळ्यांच्या गजरात (दि.1) डिस्चार्ज दिला आहे. नारायणगाव येथील कोविड सेंटरमध्ये वैष्णव धाम येथील 49 वर्षीय एका महिलेला पॉझिटिव्ह रुग्णाला उपचारासाठी दि 19 जुलैला ऍडमिट केले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत पती व मुलगा हे संशयित म्हणून उपचार घेत होते. उपचारादरम्यान पती व मुलाला निगोटिव्ह रिपोर्ट आल्याने घरी सोडले.

संबंधित महिलेवर 12 दिवस उपचार करून कोविड सेंटरमधील सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे आरोग्य चांगले लाभावे यासाठी शुभकामना देऊन त्यांना डिस्चार्ज दिला. यावेळी डॉ. प्रशांत शिंदे डॉ. योगेश आगम, डॉ. मिलिंद घोरपडे, डॉ. अभिजित काळे, डॉ. लहू खैरे, डॉ. शशांक,डॉ. ऋषिकेश रासने, कर्मचारी उपस्थित होते. रुग्णांनी डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.