कोल्हापूर(प्रतिनिधी) : ओमायक्रॉन विषाणूने अखेर कोल्हापुरात शिरकाव केला आहे.आज दुपारच्या सुमारास कोल्हापुरात पहिला बाधित रुग्ण आढळल्याचे समोर आले.यानंतर आरोग्य यंत्रणेबरोबरच शहरात एकच खळबळ उडाली. मात्र त्वरित उपाययोजना करत तो भाग सील करण्यात आला आहे. तर नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घेणेचे आवाहन प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केली आहे.
आय टी आय परिसरातील एका कुटुंबातील चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. तर यातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले होते. मात्र खबरदारी म्हणून चार पैकी तिघांचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले. आज दुपारी त्यातील एका व्यक्तीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या एका व्यक्तीस ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
कोल्हापुरात हा पहिलाच रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा संतर्क झाली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेने सुरू केले आहे. तसेच रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित करण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याचे माहिती आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहे.
संबधित व्यक्तीचे लसीकरणाचे 2 डोस पूर्ण
संबधित ओमायक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले होते मात्र संबधित रुग्णाला ओमायक्रॉन या नवीन विषाणूची लागण झाल्याने सौम्य लक्षण दिसत होते. त्याच्या संपर्कात त्यांच्या घरातील ४ व्यक्ती होते. तर ४ ही व्यक्ती पॉझिटिव असून त्यातील दोघांना डेल्टा प्लस ची लागण झाली आहे. व एकाला ओमायक्रोन ची लागण झाल्याचे डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले आहे. खबरदारी बनवून आजूबाजूच्या भागातील संपर्कात आलेल्या ३५ लोकांची सँम्पल घेतले असल्याचे देखील प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले आहे.
मागील 2 आठवड्यापूर्वी देखील 2 संशयित व्यक्ती आढळले
मागील दोन आठवड्यापूर्वी १३ व १४ डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलिया व नायझेरियातून आलेले 2 व्यक्ती जण ओमायक्रॉन संशयित आढळून आले होते. मात्र त्याचे स्वॅब पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर ते निगेटिव्ह आले होते. यामुळे कोल्हापूरवासियांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आज जिल्ह्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटाझरचा वापर करावा व लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे हे गरजेचे बनले आहे.