आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी नाशिक मध्ये पहिला गुन्हा दाखल

नाशिक –

लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता उपोषण केल्याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला तालुक्यातील मुरमी या गावात, ग्रामपंचायत मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करत ९ जणांनी उपोषण करण्यास सुरुवात केली. मात्र उपोषण करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

१० मार्च २०१९ रोजी देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आनंद पानसरे,गणेश बगाटे, रावसाहेब शिंदे, बाळू जोंधळे, आनंदा सोनावणे, सुनीता जोंधळे, बाबासाहेब शिंदे, राजाराम पानसरे, बबन शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)