नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बस्तान दिसून येत असताना आता देशातील रस्त्यांवर हायड्रोजन कार धावणार आहे. भारतात हायड्रोजन कारसाठी लागणारं सर्व साहित्य उपलब्ध आहे आणि त्याद्वारे देशात कार चालवली जाऊ शकते. हेच दाखवून देण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज हायड्रोजनवर चालणाऱ्या कारमधून संसदेपर्यंतचा प्रवास केला आहे.
देशातील बहुप्रतीक्षित पहिल्या हायड्रोजन कार आज रस्त्यावर धावली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच कारमध्ये बसून आज संसदेमध्ये पोहोचले. यादरम्यान, स्वच्छ इंधनावर चालणारी ही कार लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली होती. ही कार टोयोटा कंपनीच्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आली आहे. तसेच यामध्ये अॅडव्हान्स फ्युएल सेल लावण्यात आले आहेत. हे अॅडव्हान्स सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मिश्रणातून वीज तयार करते. या विजेवरच ही कार चालते. उत्सर्जनाच्या रूपात या कारमधून केवळ पाणी बाहेर येते.
Delhi | Union Road Transport & Highways minister Nitin Gadkari arrives at Parliament in a green hydrogen-powered car
The name of this car is ‘Mirai’, it means the future. We have to become self-reliant in fuels as well, he says. pic.twitter.com/u5cA8IGoxq
— ANI (@ANI) March 30, 2022
दरम्यान, इंधनाच्या विविध पर्यायांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेत आणि इतर चर्चांमध्ये बोलत असतात. कार, बस आणि ट्रकसाठी पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून हायड्रोजन वापरणं सहज शक्य आहे. हे आजनितीन गडकरी यांनी दाखवून दिले आहे. याविषयी बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, “ही कार पूर्णपणे पर्यावरणपुरक आहे. त्यामधून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. त्यांनी सांगितले की, ही कार भारताचे भविष्य आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या कारमुळे मोट्या प्रमाणात प्रदूषण पसरते. मात्र हायड्रो फ्युएल सेल कारमधून अजिबात प्रदूषण होत नाही.