नवी दिल्ली – कोरोनासोबतच्या ११ दिवसांच्या लढ्यानंतर देशातील पहिल्या महिला हृदयरोग तज्ज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचं निधन झालं. त्या १०३ वर्षांच्या होत्या. याबाबत नॅशनल हार्ट इन्स्टीट्यूट अर्थात ‘एनएचआय’तर्फे माहिती देण्यात आली.
एका अधिकृत पत्रकाद्वारे एनएचआयने, ‘देशाच्या पहिल्या महिला कार्डिओलॉजिस्ट डॉ. एस पद्मावती यांचं कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळं २९ ऑगस्ट रोजी निधन झालं’, अशी माहिती दिली.
एनएचआयने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, कोरोना संसर्गामुळं त्यांना श्वसनास अडचण येत होती. त्यांना ताप असल्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्युमोनियाचा संसर्गही झाला. यातच हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्यांचं निधन झालं.
डॉ. शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती यांचा जन्म १९१७ साली म्यानमारमध्ये झाला होता. पण, दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान जपानच्या आक्रमणानंतर त्या भारतात आल्या आणि इथं येऊन त्यांनी देशातील पहिल्या महिला हृदयरोग तज्ज्ञ होण्याचा बहुमान मिळवला. त्यांना
रविवारी पंजाबी बाग येथील कोविड 19 रुग्णांवर केल्या जाणाऱ्या अंत्यस्कारांच्या स्थळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयानं आखून दिलेल्या नियमावलीमुसार यावेळी अंत्यदर्शनासाठी फार कमी संख्येने लोक उपस्थित होते.