एक हजार कसोटी सामने खेळणारा इंग्लंड पहिला संघ

भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत गाठणार मैलाचा दगड एजबॅस्टन येथे 51वा कसोटी सामना

भारताविरुद्ध इंग्लंडचेच वर्चस्व

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुबई: येत्या बुधवारी सुरू होत असलेला भारताविरुद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना इंग्लंडसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. इंग्लंडचा हा तब्बल एक हजारावा कसोटी सामना असून हा बहुमान मिळविणारा इंग्लंड हा जगातील पहिला संघ आहे. या ऐतिहासिक कसोटी सामन्याच्या पार्श्‍वभूमीवर आयसीसीनेही इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील या संस्मरणीय क्षणाची आठवण म्हणून आयसीसीच्या वतीने आयसीसीच्या सामनाधिकारी एलिट पॅनेलचे प्रमुख व न्यूझीलंडचे माजी कर्णधार जेफ क्रो यांच्या हस्ते इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रेव्हज यांना चांदीचे स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीचा खेळ सुरू होण्यापूर्वी एका खास समारंभात हे स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.

इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 1877 मध्ये पहिला कसोटी क्रिकेट सामना खेळला होता. त्यानंतर तब्बल 141 वर्षांनी इंग्लंड संघ आपला एक हजारावा कसोटी सामना खेळणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या 999 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडने 357 कसोटी सामन्यांत विजय मिळविला असून 297 कसोटी सामन्यांत पराभव पत्करला आहे. उरलेले 345 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत.
इंग्लंडने भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना जून 1932 मध्ये खेळला होता.

त्यानंतर भारत व इंग्लंड यांच्यातील 117 कसोटी सामने खेळविले गेले असून इंग्लंडने त्यातील 43 कसोटी जिंकून वर्चस्व गाजविले आहे. भारताला त्यातील केवळ 25 कसोटी सामने जिंकता आले आहेत. इंग्लंडच्या भूमीवर उभय संघांमध्ये झालेल्या 57 कसोटी सामन्यांमध्ये तर इंग्लंडने 30 कसोटी जिंकून हुकमत गाजविली आहे. भारताला इंग्लंडमध्ये केवळ 6 कसोटी जिंकता आल्या असून 21 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)