श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये करोनाने आज पहिला बळी घेतला आहे. ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून देशात बळींची संख्या १४वर गेली आहे.
माहितीनुसार, त्या ६५ वर्षीय वृद्ध करोनाशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजाराने पीडित होता. या वृद्धाने दिल्लीत आयोजित ‘तबलीगी जमात’ कार्यक्रमात नुकताच सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामध्ये इंडोनेशिया आणि मलेशिया येथील नागरिकांनीही सहभाग घेतला होता. त्यांच्या संपर्कात आल्याने त्यालाही करोना झाल्याचे निदान झाले होते.
दरम्यान, काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यामध्ये आणखी चार नवीन रुग्ण आढळून आल्याने राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११वर पोहचली आहे. येथील अनेक रस्ते सुरक्षा यंत्रणांनी वाहतुकीसाठी बंद केले आहेत.