पहिल्याच दिवशी मुंबईच्या त्रिशतकी धावा

रोहतक: पृथ्वी शॉ, अजिंक्‍य रहाणे, शम्स मुलाणी व शार्दुल ठाकूर यांच्या अर्धशतकांच्या मदतीने मुंबईने आजपासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 8 बाद 362 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध हरियाणाने 3 बाद 279 धावा केल्या.

सापाच्या एन्ट्रीमुळे सामन्यास विलंब                                                                                     रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि आंध्र प्रदेशदरम्यान सामना होत आहे. प्रत्यक्ष खेळ सुरू होण्यापूर्वी मैदानात साप आल्याने खेळाडूंची तारांबळ उडाली. कर्मचारी वर्गाने बऱ्याच वेळ खटपट करून अखेर सापाला बाहेर काढले व नंतर खेळ सुरू झाला.

जाफरचे दीडशतक
भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि रणजीपटू वासिम जाफरने आज आंध्र प्रदेशविरुद्धच्या आजपासून सुरू झालेल्या सामन्याद्वारे रणजी स्पर्धेचा वैयक्तिक 150 वा सामना खेळला. अशी कामगिरी करणारा जाफर पहिलाच खेळाडू ठरला आहे. 150 वा रणजी सामना खेळत असलेल्या जाफरने विदर्भ संघाला सलग दोन वर्षे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

धावफलक – 1) हरियाणा पहिला डाव – 84 षटकांत 3 बाद 279. (शुभम रोहिला 117, शिवम चौहान 117) विरुद्ध महाराष्ट्र. 2) मुंबई पहिला डाव – 90 षटकांत 8 बाद 362. (पृथ्वी शॉ 66, अजिंक्‍य रहाणे 79, शम्स मुलाणी 56, शार्दुल ठाकूर 64, भार्गव भट 3-110) विरुद्ध बडोदा.

Leave A Reply

Your email address will not be published.