प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या या पहिल्या ऍनिव्हर्सरीनिमित्ताने निक जोनासने प्रियांकाबरोबरच्या आपल्या वर्षभरासाठीच्या संसारासंदर्भात एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
राजस्थानात जोधपूर पॅलेसमध्ये विवाह समारंभ झाल्यावर त्यांच्यात आणि प्रियांकामध्ये बेबनाव निर्माण झाल्याची अफवाही पसरली होती.
मात्र थोड्याच दिवसांत ही अफवा विरली आणि दोघांचा संसार सुखात रंगला. या वर्षभरामध्ये आपल्याला मिळालेले प्रेम कायमस्वरूपी टिकणारे आहे, असे निकने म्हटले आहे. यानिमित्ताने निकने ख्रिश्चन पद्धतीने विवाहाच्यावेळचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.
यामध्ये ते दोघेही एकमेकांचे हात हातात धरून चर्चमधून बाहेर पडताना दिसत आहेत. “तुला साथ देण्याचे माझे वचन आहे. तेंव्हाही होते, आजही आहे आणि कायमस्वरूपी असणार आहे.’ असे निकने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रियांकानेही निकबाबतच्या आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मला शोधून काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असे तिने म्हटले आहे. याबरोबर तिने आपल्याला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचेच आभारही मानले आहेत. प्रियांका आणि निक जोनास यांचा जोधपूरच्या उम्मेद पॅलेसमध्ये 1 डिसेंबर 2018 रोजी हिंदू रितीरिवाजांबरोबर ख्रिश्चन पद्धतीनेही विवाह झाला होता.