#CWC19 : …तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान अंतिम सामना

पुणे – भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेल्या सामन्याने जरी पाकिस्तानच्या उपान्त्यफेरीच्या आशा धुसर झाल्या असल्यातरी काही गणितांचा आधार घेतला तर पाकिस्तानचा संघ उपान्त्यफेरी गाठू शकतो आणि उपान्त्य फेरीत त्यांचा सामना हा ऑस्ट्रेलियासोबत होईल. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात त्यांनी विजय मिळवला आणि भारताने आपल्या प्रतिस्पर्ध्यासोबत विजय मिळवल्यास अंतिम सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होईल.

भारत पाकिस्तान यांच्यात एकदा तरी विश्‍वचसकची फायनल होईल असे सर्व क्रिकेट रसिकांना वाटत असते. परंतु आतापर्यंतच्या 12 वर्ल्ड कपमध्ये केवळ सेमी फायनल एकदा आणि क्वार्टर फायनलला एकदा अशी स्थिती निर्माण झाली होती. पण यंदा भारत पाकिस्तान फायनल होण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. तसे गणित बनताना सध्या दिसत आहेत. ही शक्‍यता निर्माण होण्याचे अनेक कारणे आहेत.

भारत पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याची शक्‍यता कशी निर्माण होते हे पाहू :-

1) भारत आणि बांगलादेश यांच्यात 2 जुलै रोजी होणाऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवायला हवा. त्यामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. भारताचे या स्पर्धेत 13 अंक होतील. बांगलादेशचे केवळ सात अंक राहतील त्यामुळे त्यांनी पुढचा पाकिस्तान विरूद्धचा सामना जरी जिंकला तरी त्यांचे केवळ 9 अंक होतील. त्यामुळे त्यांना संधी राहणार नाही.

2) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 3 जुलै रोजी होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवायला हवा. त्यामुळे इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. इंग्लंड हा सामना पराभूत झाला. त्याचा स्पर्धेतील अखेरचा सामना ठरले. त्यांचे 10 अंक राहतील.
पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात 5 जुलै रोजी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला विजय आवश्‍यक आहे. त्यामुळे त्यांचे 11 अंक होतील त्यामुळे त्यांचा सेमी फायनलचा मार्ग मोकळा होईल.

3) भारत आणि श्रीलंका यांच्यात 6 जुलै रोजी होणाऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवावा लागले. त्यामुळे भारताचे 15 अंक होती. भारत सहा जुलैला काही काळासाठी पहिल्या स्थानावर जाईल. श्रीलंकेचा स्पर्धेतील प्रवास संपेल. पण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात राऊंड रॉबिनमधील अखेरचा सामना हा ऑस्ट्रेलियाला जिंकावा लागेल. तर ऑस्ट्रेलिया पुन्हा 16 अंकासह पहिल्या स्थानावर येऊ शकतो.
यानंतर गुण तालिकेत – ऑस्ट्रेलिया 16 अंक, भारत 15 अंक, न्यूझीलंड 13 अंक आणि पाकिस्तान 11 अंक

4) 9 जुलैपासून सेमी फायनल लढत सुरू होतील. वरील शक्‍यता जशाच्या तशा लागू झाल्यास पहिली सेमी फायनल ही ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघात होईल. मग हा सामना पाकिस्तानला जिंकावा लागेल आणि फायनलच तिकीट मिळवावे लागले.

5)11 जुलै रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरी सेमी फायनल होईल. या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदा एकमेंकासमोर येतील. राऊंड रॉबिनमधील या दोन्ही संघाचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारताला हा सामना जिंकून चौथ्यांदा फायनलचे दरवाजे उघडावे लागतील. या सर्व शक्‍यता खऱ्या ठरल्या तर आणि तरच 14 जुलैला भारत आणि पाकिस्तान हा स्वप्नातील फायनल सामना होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)